सुनिता विल्यम्स नासाचे अंतराळवीर, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर पृथ्वीवर परतले आहेत.
स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम अंतराळयान भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३वाजुन २७ मिनिटांनी फ्लोरीडा जवळच्या समुद्रात उतरले. सगळ्यात आधी नासाचे निक हेग यांना बाहेर काढल गेल.त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोबॉनॉव्ह नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि मग बुच विल्मोर यांना कॅप्सुल मधुन बाहेर काढण्यात आले.
अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास सुमारे १७ तासांचा होता. ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर वेगवेगळयावेळी पॅराशूट उघडली.त्यामुळे कॅप्सुल वेग कमी झाला.पॅराशूटची पहिली जोडी पॅराशूट १८ हजार फुटांवर असताना उघडली. तर दुसरी मुख्य जोडी साडेसाह हजार फुटांवरती उघडली.मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सुल जोडुन जहाजाच्या प्लॅटफॉर्म वरती उतरून ठेवण्यात आली. आणि त्यानंतर एक एक करुन क्रू ला बाहेर काढण्यात आलं.रिकव्हरी शिपवरती काही काळ घालवल्यानंतर या चारही अंतराळवीरांना स्टंगला नासाच्या तळावरती नेण्यात आलं.तिथ अंतराळवीरांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातील . आणि नंतर ते कुटुंबीयांना भेटू शकतील.
सुनीता विल्यम्स बायोग्राफी
नाव _ सुनिता विल्यम्स तिचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला. जन्म ठिकाण_ ओहायो,अमेरिका वडिलांचे नाव डॉक्टर दीपक एन पंड्या. पतीचे नाव_ मायकल जे. विल्यम्स कारकीर्द_ भारतीय वंशाची अंतराळ शास्त्रज्ञ (नासा)सुनिता विल्यम्स या भारतीय- अमेरिकन अंतराळवीर आणि नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांचे वय आता 59 वर्षे आहे अंतराळ मोहीम_space X crew – 9 बोईंग फूड फ्लाईट टेस्ट एक्सपेडिशन सुनीता विल्यम्स यांना पद्मभूषण पुरस्कार 2008 मध्ये मिळाला आहे.

अंतराळात राहण्याचा अनुभव कसा असतो?
अंतराळात असताना अंतराळवीर हे काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोल ने ठरवलेलं असतं. या अंतराळ स्थानकात ऑक्सिजन खिळवलेला असतो. त्यामुळे इथे सतत ऑक्सिजन मास्क घालून बसावं लागतं नाही. अंतराळवीर रोज लवकर उठतात. म्हणजे सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास फोनच्या आकाराच्या त्यांच्या झोपण्याच्या मॉड्युल्च नाव आहे. हार्मनी इथल्या पॉडसमध्ये स्लीपिंग बॅग असतात. झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप पण आहेत त्याद्वारे हे अंतराळवीर आपल्या घरच्या सोबत संपर्कात राहू शकतात. शिवाय पुस्तक, फोटो यांसारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा जागा असते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ISS मधल्या बाथरूम या सक्षम सिस्टीम वर काम करतात. एरवी येथे घाम आणि मित्र यांचं रिसायकलिंग करून त्यांचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर केले जात. पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र हे वेगळ्याने साठवून ठेवलं जातं मग अंतराळवीर कामाला लागतात. अंतराळ स्थानकात त्यांचा सगळ्यात जास्त वेळ वेगवेगळे प्रयोग करण्यात किंवा मेंटेनन्सच्या कामात जातो
अंतराळात राहिल्याने शरीरात होणारे परिणाम कसे कमी करू शकतो?
अंतराळात राहण्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे मोजण्यासाठी अंतराळवीर हेल्मेट किंवा मेंदू आणि रक्त मॉनिटर करणार यंत्र वापरतात. अंतराळ स्थानकात गेलेल्या प्रत्येकाला स्पेस वॉक करायला मिळेलच असेही नाही, आणि स्पेस वॉक साठी जेव्हा अंतराळवीर बाहेर पडतात, तेव्हा एक गोष्ट स्थानकाची येते ती म्हणजे अंतराळातला वास त्याला space smell असे म्हणतात. पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास येतात म्हणजेच धुतलेल्या कपड्यांचा येणार सुगंध किंवा मोकळ्या हवेचा गंध पण, अंतराळात एकच वास असतो. ज्याची त्यांना पटकन सवय होते. स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेस सूट, सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरनांचा परिणाम होतो. रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर Free Radicals म्हणजे अस्थिर रेणु तयार होतात. अंतराळात राहणं शरीरासाठी खडतर असतं. हाडे ठिसूळ होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे दीर्घकाळ तिथे राहणाऱ्या अंतराळवीर रोज किमान दोन तास व्यायाम करतात. ते तीन मशीनचा वापर करतात व्यायामासाठी सायकल सुद्धा वापरली जाते.
अंतराळ मध्ये कोणी किती दिवस राहिले होते?
1.सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळातला मुक्काम 286 दिवस होता.
2.अंतराळात सर्वाधिक काळ राहिले नासाचे अंतराळवीर फ्रँक रुबिओ 371 दिवस.3. सप्टेंबर 2024 रशियन कॉस्मो नॉट्स ओलेग आणि निकोलाय चब हे अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये 374 दिवस राहून परतले.
पण अंतराळ स्थानकात सलग सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती व्यालेरी पोलिकोव्ह 1990 च्या दशकात वीर अंतराळ स्थानकात तब्बल 437 दिवस राहिले होते.
17 तासांचा प्रवास असंख्य अडथळे Dragon spacecraft पृथ्वीवर कस आलं?
5 जून 2024 ला सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर अवकाशात गेले होते. ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आठ दिवस राहतील असं नियोजन होतं. पण त्यांच्या यानात बिघाड झाला, आणि त्यांना तब्बल नऊ महिने अंतराळातच अडकून राहावं लागलं. त्यांना परत आणण्यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न झाले. एलोन मास्क यांच्या स्पेस एक्स कंपनी कडे या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार spece x dragon capsul 14 मार्चला अंतराळात झेपावलं होतं 18 मार्चला सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्यासोबत असलेल्या तीन अंतराळवीरांनी स्पेस स्टेशन सोडलं त्यानंतर 17 तासांचा प्रवास करून स्पेस एक्स हे ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीवर परतणार होत या यांनाच्या पृथ्वीवर परतण्यात दोन मोठे धोके होते.
पृथ्वीच्या वातावरणात री एंट्री केल्यानंतर पॅराशुट च्या मदतीने यानाचा स्पीड कमी करण्यात आला. आणि त्यानंतर हे यान समुद्रात डिसाईड केलेल्या लॅण्डिंग झोनमध्ये म्हणजे थेट पाण्यात उतरलं. यानाला पृथ्वीच्या वातावरणात यायला कुठलीच अडचण आली नाही. मात्र जेव्हा एन्ट्री झाली तेव्हा ड्रॅगन फ्रीडम यानाला 1926.667 डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. आत बसलेल्या अंतराळवीरांसाठी ही मोठी कसोटी होती.पृथ्वीच्या वातावरणात या फ्रीडम कॅप्सूल यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. जवळपास सात मिनिट हा संपर्क होत नव्हता, त्यामुळे धाकधूक वाढली होती. सात मिनिटानंतर संपर्क पुन्हा झाला. आणि सुनीता विल्यमची एन्ट्री झाली. त्यानंतर पॅराशुटच्या जोड्या उघडाव्या लागतात. त्यानंतर ड्रॅगन कॅप्सूल तरंगत तरंगत समुद्रात आलं. आणि पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी ते स्लॅश डाऊन झालं. कॅप्सूलचा रंग काळपट झाला होता. कारण 2000 डिग्री तापमान सहन केलं होतं. पोहोचलेल्या टीमने कॅप्सूलची तपासणी केली. त्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.
अंतराळमध्ये दीर्घकाळ राहण्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
अंतराळवीरांच्या शरीरातले स्नायू, मेंदू, डोळे या सगळ्यावर परिणाम होतो. सगळ्यात मोठा परिणाम होतो गुरुत्वाकर्षण नसल्याचा. गुरुत्वाकर्षणाची ओढ नसल्यामुळे हातापायाच्या स्नायूंच प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते. ताट उभे राहता येण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होत असते. ते आपल्या पाठीचे, मानेचे, पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. ते कमकुवत होऊ लागतात. अंतराळात दोन आठवड्यांच्या वास्तव्यानंतर muscle mass 20% कमी होतो. आणि दोन ते सहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर muscle mass 30% कमी होतो. यासोबतच शरीराच्या सांगाड्यांवर हाडांवर पृथ्वी सारखा कामाचा ताण नसतो, त्यामुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात. आणि त्यांच्यातील शक्ती कमी व्हायला लागते. सहा महिन्यांच्या काळात 10% पर्यंतच Bone Mass कमी होतं. त्यामुळे अंतराळवीरांच फ्रॅक्चर होण्याच प्रमाण वाढतं. आणि ते भरून येण्यासाठी जास्तीत जास्त काळ लागतो. पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातली हाडं पहिल्यासारखी होण्यासाठी चार वर्षे लागू शकतात.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अमेरिकन अंतराळवीर जुन महिन्यात पृथ्वीवरून इंटरनेशनल स्पेस स्टेशनला गेले त्यांचा मुक्काम आठ दिवसांचा असणार होता पण ते लवकर येऊ शकले नाही याला कारण ते ज्या बोईंग स्टार विमानाने गेले होते ते परतीच्या प्रवासासाठी सुरक्षित नाही अस निष्पन झाल होत. त्यामुळे ते फेब्रुवारी पर्यंत अंतराळातच दिवस काढले. शेवटी खूप प्रयत्ननंतर त्यांना यश भेटले आणि सुखरूप पृथ्वीवर परतले.