Shri Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana:’श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ मुलींच्या नावे 10,000₹.

siddhivinayak-bhagyalaxmi-yojana

visit this official website:

लाडक्या बहीण योजनेनंतर राज्यामध्ये आणखी एक योजना सुरू झाली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ने ही योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींना दहा हजार रुपये मिळणार आहे. मुलींच भविष्य सुरक्षित करण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिराने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींच्या खात्यामध्ये थेट दहा हजार रुपये टाकले जाणार आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ आठ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या सर्व मुलींना लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेला मुलींच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून टाकले जाणार आहे. हे पैसे मुलीच्या आईच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे. आता सध्या श्री सिद्धिविनायक ट्रस्टने या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना राज्यामध्ये 100% लागू होणार आहे.

'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' मुलींच्या नावे 10,000₹

Bhagya Laxmi Yojna:मुलींसाठी आणखी एका योजनेची अंमलबजावणी:

सरकारच्या वतीने स्त्री जन्माच स्वागत करण्यासाठी ‘ माझी कन्या भाग्यश्री योजना’ राबविण्यात येते. योजनेत पहिल्या मुलीवर समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपये अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.तर ‘ लेक लाडकी योजना’ ही सुरू करण्यात आली. अठराव्या वर्षापर्यंत 75 हजार रुपये रक्कम दिले जाते. मात्र आता ‘ भाग्यलक्ष्मी योजना’ आणण्यात येत आहे. यात मुलीच्या आईच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले जाणार आहे.

भाग्यलक्ष्मी योजनेची वैशिष्ट्ये:

  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं
  • राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींना लाभ मिळेल.
  • मुलींच्या नावे दहा हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवणार.
  • अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘ श्री सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजना’ राबवण्याचा प्रस्ताव शासनमान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

Shri Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana:भाग्य लक्ष्मी योजनेचा उद्देश:

  • न्यास व्यवस्थापन समितीने याला मान्यता दिली आहे.मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणं.
  • त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं.
  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण या उदेशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरून लेक वाचवा लेकीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यायाचा देखील हातभार लागावा या हेतूनं महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या बालीकांच्या नावावर दहा हजार रुपयांच्या फिक्स डिपॉझिट या स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याची योजना प्रस्थापित करण्यात आली आहे.
  • न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष हे लवकरच जाहीर करण्यात येतील.अशी माहिती देखील सिद्धिविनायक ट्रस्ट काडून देण्यात आली आहे.
  • दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून न्यासला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे.
  • गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाचे पुस्तक उपलब्ध करण्यासाठी योजना राबवण, डायनॅसिक सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणं आधी स्वरूपाची समाज उपयोगी काम या ट्रस्ट द्वारे करण्यात येतात.
  • श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bhagyalaxmi Yojana:महिला दिनामुळे मिळणार लाभ.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुपरहिट ठरली आहे.अवघ्या काही महिन्यातच या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली.या योजनेअंतर्गत दरमहा 1500रुपये दिले जातात.लाडकी बहीण योजने सह सरकारच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली.

8 मार्च ‘ International Womens Day ‘ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या दिवशी जन्म झालेल्या बालिकांना या सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना थेट 10,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या मुलीवर समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana:प्रॉफिट

‘ सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबवण्याची घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली.सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांनी सांगितले की सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षी ट्रस्टला 133 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षापेक्षा यात 15 टक्क्याने वाढ झाली असल्याचे सदानंद सरवणकर यांनी म्हटले. न्यासाचे 2024- 25 साठीचे उत्पन्न 114 कोटी इतके पकडण्यात आले होते, परंतु विश्वस्त व प्रशासन यांच्या चांगल्या नियोजनामुळे 114 वरून 133 कोटीच्या घरात गेले आहे. तसेच पुढील वर्षासाठी 2025- 26 न्यासाचे अपेक्षित उत्पन्न 154 कोटी रुपये इतके गृहीत धरण्यात आले आहे.