(Prajkata Mali)प्राजक्ता माळी प्रकरण नेमकं काय आहे?

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे वर आरोप करत असताना, प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचं नाव घेतल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्राजक्ता माळीन सुद्धा आज पत्रकार परिषदेत सुरेश धस यांनी जाहीरपणे आपली माफी मागावी. असं वक्तव्य केले तर दुसरीकडे यांना सुद्धा नोटीस पाठवण्याची माहिती दिली जाते. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांनी सुद्धा नोटीस पाठवल्याची माहिती दिलीय. एकंदरीतच प्राजक्ता माळी हिच्यावर करुणा मुंडे आणि सुरेश धस नेमक काय म्हणाले होते. हे प्रकरण अचानक इतका चर्चेत का आलं का प्राजक्ता माळी ला बळीचा बकरा केल जात आहे का? समजून घेऊ.
करुणा मुंडे यांनी त्याचा पतीवर गेल्या काही वर्षात अनेक आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभेच्या दरम्यान सुद्धा परळीत निवडणूक लढवण्याची घोषणा करत असत मुंडेंची दहशत संपवायची असा नारा दिला होता. मात्र धनंजय मुंडे मोठ्या मताने निवडून आले.

पण बीडमध्ये एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानभवनापासून ते रस्त्यापर्यंत भाजपचे आमदार सुरेश धसांनी आरोपांची राळ उठवली होती. यामध्ये वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या असणारे संबंध ते बीडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे या सगळ्यांन वरून मुंडेना टार्गेट केल. पण काल या प्रकरणाला धसांच्या एका वक्तव्यामुळेवेगळच वळण मिळालं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात sp ची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर सुरेश धस माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्तेमागे असलेले आका यांचं बीड तालुक्यातील गावागावात जमिनी आहेत. आता त्यांनी केलेले कारणामे दररोज एक एक करून पुढे येतात. त्याचे कागदपत्र माझ्याकडे येतात. शिरसाळा असो की शिंमरी पारगाव किंवा इतर गावातील लोक येतात आणि सांगतात या गावात आकाच्या नावानं100एकर आहे.आकानं तिथं प्रचंड खर्च केलेत. त्यांनी आपल्या जमिनीत 30 कोटी 40 कोटींचे बंधारे बांधलेत. इतकं कुठून आलं. पाच वर्षांमध्ये फक्त असं म्हणत वाल्मीक कराडांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केलीये असे आरोप धसांनी केले. वाल्मिक कराडांवर केलेल्या आरोपा नंतर मात्र धसांची गाडी वेगळ्याच ट्रॅक वर पाहायला मिळाली.ते पुढ अस म्हणाले की आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. रश्मिका वंदना, सपना चौधरी यांचे इव्हेंटचे कार्यक्रम, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी परळीला यावं.तिथं शिक्षण घ्याव.आणि संपूर्ण देशात त्यांचा प्रसार करावा. सपना चौधरी रश्मिका मंदांना, अजून काय तर प्राजक्ता माळी प्राजक्ता माळी सुद्धा आमच्याकडे येतात वाटतं. बरका..हे सगळं काही बघायचं असेल, नवीन चित्रपट कुणाला काढायचा असेल तर अशा काही मोठ्या विभूती आहेत त्यांच्या तारखा कशा पद्धतीने मिळतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथे येतात. याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला हवा असेल तर तो परळी आहे.बोलत असताना सुरेश धस अधून मधून हसत होते. सुरेश धसानी वेगळाच ट्रॅक पकडला.

(Prajkata Mali) प्राजक्ता माळी प्रकरण

करुणा मुंडेंनी प्राजक्ता माळी वर काय आरोप केला?

करुणा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होत. त्यामध्ये धनंजय मुंडेंनी माझा छळ केला. मला जेलमध्ये पाठवलं माझी छोटी छोटी मुलं जेलमध्ये जाताना रडत होती. तरी त्यांना दया आली नाही. माझ्या बहिणीला सुद्धा त्यांनी जाळ्यात ओढलं. यानंतर बोलताना करुणा मुंडेंनी प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीच नाव घेत खळबळ जनक दावा केला. ती म्हणाली
अशा अभिनेत्रींसाठी ते ओबेरॉय हॉटेल बुक करतात माझे पती धनंजय मुंडे हे अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्योतिका शिरोडकर लता टेपी आणि मोनिका यांच्यावरती पैसे उधळतात. असा आरोप केला. यानंतर मात्र आपल्या अनेक मराठी चित्रपटांमधून आणि विशेष करून महाराष्ट्राची हास्य जत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातन प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या प्राजक्ता माळीवर असे आरोप झाल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमात उमठत होत्या. पण या संदर्भात प्राजक्ता माळीने सुरुवातीला काहीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलेल आपल्याला पाहायला मिळालं.

धनंजय मुंडे बाबत प्राजक्ता माळी काय बोलल्या.

बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली, त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सर्वांसमोर आलेली आहे. काल नाहीतर गेले दीड महिन्यापासून हा सर्व प्रकार चालू आहे. आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेने सामोरी जातीय. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी मुकसंमती नाहीये. मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेल आहे.एक व्यक्ती आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात उद्घवेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो. तेवढेच शब्द पकडतो. त्याच्यावर हजार व्हिडिओ बनतात यूट्यूब चैनल वर मग एका सेलिब्रिटीला त्यांच्यावर वक्तव्य करण भाग पाडल जात. मग ती व्यक्ती बोलते. मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आपण आता बोललच पाहिजे. ती परत व्यक्ती बोलते. मग आता परत बोलन प्राप्त होतं कारण अस होत, का गप्प बसले का मागे हटली. मग परत ही व्यक्ती बोलते. हीच चिखल फेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरजन होतं हे होऊ नये, सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये. म्हणून यात पडले नाही .

मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला. या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही.मला असं वाटलं की, हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे. त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट. धन्यवाद. हा एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी अवळी उठावी. त्याला मी का प्रतिउत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते? दहा लोकांपर्यंतची गोष्टी हजार लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तरी किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं. आणि याला भरपूर साथ होती. ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते. ज्या संचाबरोबर काम करते. माझं कुटुंब, माझा मित्र परिवार, सगळ्या आप्तेष्ट, महाराष्ट्रातली जनता, प्रेषक ज्याचं प्रेम आहे माझावर. कोणीही एका शब्दनही कधी संशयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही. कधीही मला विचारलं देखील नाही. प्रत्येक जण मला भेटला तेव्हा म्हणला, प्राजक्ता योग्य करतीय. शांत रहा. धीराण सामोरी जा. ह्या अशा अवया उठतात आणि निघुन जातात. तू शांत रहा. धीराने सामोरी जा.ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि पाठिंबा इतका दांडगा होता, ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरच एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येते, हे अत्यंत नामुष्की कारण ती वेळ आली आहे. कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. जेव्हा एखाद्या अशाच उठलेल्या वावटळा वीषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक त्यांना आपण जनतेन निवडून दिलय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपल्या प्रश्न मांडावेत .आपल्यासाठी न्याय मागावा. आपल्या हक्काचं रक्षण करावं. आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे. अशी मंडळी जेव्हा आपल्यावरच चिखल फेक करतात. तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावीशी वाटली. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांसमोर आलेत. काल जर हे असे बोलले नसते तर मी तशीही शांत बसले होते. आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं. पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज मला तुम्हा सर्वांसमोर यावं लागलं. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो, तो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो, लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारणा लाखोंची विचारधारा होते, ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात. आणि खरी आहे, असं भासवतात. तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात. आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काही चालू आहे. लखलाभ तुम्ही ते करत रहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा काय संबंध काय? बीडमध्ये काही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर! ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काही काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट. मान्य तर मग महिला कलाकारांचीच का नाव येतात का? परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला? त्यांची नाव का नाही येत इव्हेंटमेंटच जर तुम्हाला एक उदाहरण घ्यायचं तर पुरुष कलाकारांच नाव घ्या.महिलांची नाव घेऊन अतिशय कष्टाने ज्या छोटा फॅमिली मधून येऊनअतिशय संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात. आणि आपलं एक नाव कमावतात. त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागळतात.हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचे तुम्ही पुरुष कलाकारांची नावे द्या. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावे घेतली. त्याचा वापर केला. गैरवापर केला.त्यांनी स्वतःचा trp वाढवण्यासाठी महिलांची नावे घेतली. अतिशय कुत्सितपणे पणे टिप्पणी केली. अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात. या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिक्रिया क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बर ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा त्या पण येतात का परळीला? अच्छा…कोणाला जर नवा चित्रपट करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचं काय? तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात. महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.का? कुठल्याही पुरुषाच्या राजकारणाच्या कुबड्यानशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टानी आणि मेहनतीने एखादा माणूस मोठा होतो याचा तुमचा विश्वास का नाही बसत.

सुरेश धस यांनी त्यांच्या विधानासाठी जाहीर माफी मागावी. असे प्राजक्ता माळी म्हणाल्या. पण या प्रकरणात सुरेश धस यांनी माफी मागायला नकार दिला. पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांना सुद्धा आपण नोटीस पाठवली असून एक महिला म्हणून या प्रकरणाकडे मुंडे यांनी संवेदनशील पणे बघावं. अस प्राजक्ता माळीन म्हटलं.या संपूर्ण प्रकरणा बाबत प्राजक्ता माळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देणार आहेत.