Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना| महिलांना मिळणार 11000 ₹

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे; तसेच गरोदर महिलेच्या पोटी जन्मणारे बाळ सदृढ असावे म्हणुन केंद्र शासनाच्या वतीने सन 2017पासुन प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना राबविण्यात येत आहे. शासनाने यंदा या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्याबरोबरच या योजनेची व्याप्ती सुद्धा वाढवलेली आहे. या योजनेअंतर्गत आता पहिल्या आपत्यानंतर पाच हजार रुपये देण्यात येतात तर दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या नियमावली मध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे. अगोदर या योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येत होते आता दोन टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येणार आहे. शिवाय दुसरी मुलगी झाल्यास ₹6000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. तो सुद्धा एकाच टप्प्यात दिला जाणार आहे.म्हणजेच दुसरी मुलगी झाल्यानंतर सहा हजार रुपयांचा जो लाभ आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

तो एका टप्प्यामध्येच एकदम दिला जाणार आहे.कुपोषणामुळे गरोदर महिला ही रक्तक्षयग्रस्त होण्याची अधिक भीती असते.तसेच अशा महिलांच्या पोटी जन्मणारे अपत्यही कमी वजनाचे असते. हे कुपोषण थांबावे; तसेच बहुतांश गर्भवती महिला या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणांनी अगदी बाळंतपणापर्यंत काम करीत असतात, त्यांना शारीरिक व मानसिक आरामाची गरज असते, त्यांना तो आराम मिळावा तसेच त्यांचा बुडीत रोजगार अंशतः मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना राबविण्यात येत आहे.आणि या योजनेअंतर्गत गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत 13,443 कोटी रुपयांचे अनुदान गरोदर मातांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे या महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे. आणि महिलांचे जीवन सशक्त आणि सुलभ झाले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यावा:

  • तर या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेने सहा महिन्याच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आणि प्रसूतीपूर्व तपासणी करून घेणे हे आवश्यक आहे.
  • तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी अनुदान घेण्यासाठी नवजात शिशूची जन्मनोंदणी करणे आणि बालकास लसीकरण करणे हे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अनुदान हे देण्यात येणार आहे.
  • अनुदान महिलांच्या बँके खात्यावर जमा करण्यात येते तसेच सहकारी संस्थांच्या केंद्रावर रोख रक्कम सुद्धा देण्यात येते, मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून सुद्धा अनुदानाची रक्कम महिलांना देण्यात येते.
  • आतापर्यंत या योजनेअंतर्गत सन 2017 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये 3.03 कोटी गरोदर महिलांना या योजनेचा लाभ हा देण्यात आलेला आहे. या योजनेचा अधिकाधिक गर्भवती महिलांना लाभ मिळावा म्हणून शासनाने सिटीझन लॉगिनद्वारे मोबाईल वरती ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मातांना आर्थिक मदत होत आहे, त्यामुळे त्या सकस आहार घेण्याबरोबरच काळजी सुद्धा घेत आहेत. या योजनेमुळे माता मृत्यू, बालमृत्यू कमी होण्याबरोबरच मुलीचा जन्मदर वाढण्यास मदत होणार आहे.

या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे.

  • नोंदणी कार्ड
  • आधार कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • रेशन कार्ड
  • एक पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

या ठिकाणी गरोदर महिलांचे नोंदणी कार्ड हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांचे आधार कार्ड हे या ठिकाणी आवश्यक आहे. बँकेचे पासबुक. रेशन कार्ड. एक पासपोर्ट साईज फोटो. तसेच मोबाईल नंबर या ठिकाणी एवढे सगळे कागदपत्रे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे.लाभार्थी महिलेचे हमीपत्र/ संमतीपत्र द्यावे लागेल. त्यावर तिची व तिच्या पतीची रितसर स्वाक्षरी असणे गरजेचे आहे.मोबाईल नंबर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.दुसऱ्या हप्त्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेले कागदपत्र किंवा एम सी पी (MCP) कार्ड ची छायाप्रत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

पात्र अर्जदार(PMMVY)ऑनलाइन पोर्टल द्वारे किंवा महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून PMMVY अर्ज डाऊनलोड करून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर लॉगिन करून तो फॉर्म भरू शकतो.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हेल्पलाइन क्रमांक PMMVY हेल्पलाईन क्रमांक -२३३८२३९३

जर महिलेचा गर्भपात किंवा मृत बाळंतपणाच्या बाबतीत काय होते?

गर्भपात व मृत बाळंतपणाच्या बाबतीत, लाभार्थी महिला भविष्यातील गर्भधारणेसाठी राहिलेल्या हप्त्याचा दावा करण्यासाठी पात्र असेल. उदाहरणार्थ. समजा जर महिलेला पहिला हप्ता मिळाल्यानंतर जर लाभार्थी महिलेचा गर्भपात झाला असेल तर भविष्यातील गर्भधारणेसाठी उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यास ती पात्र राहील.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे.

  1. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष रुपये आठ लाखा पेक्षा कमी आहे.
  2. अनुसुचित जाती आणि जमातीच्या महिला.
  3. 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या( दिव्यांग जन) महिला.
  4. बीपीएल शिधापत्रिका धारक महिला .
  5. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PMJAY)अंतर्गत महिला लाभार्थी.
  6. ई- श्रम कार्ड धारक महिला.
  7. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
  8. मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.
  9. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मतांनी मदतनीस अशा वर्कर .

पंतप्रधान मातृ वंदना योजनेची उद्दिष्टे:

आर्थिक सहाय्य:

महिलेला पुरेशी विश्रांती घेता यावी म्हणून, आणि प्रथम होणाऱ्या जिवंत बाळाच्या जन्मापूर्वी महिलेला रोख स्वरूपात नुकसानीची भरपाई देणे गर्भवती महिला व स्तनदा मातामध्ये आरोग्याचे वर्तन सुधारणे.

माता आणि बालमृत्युदर कमी करणे: माता नी बाल के दर कमी करण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना खूप महत्त्वाची ठरते.

वेतन नुकसानीची भरपाई: गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान होणाऱ्या संभाव्य वेतन नुकसानीची भरपाई करणे. पोषण आणि आरोग्य सुधारणे: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला मातांच्या तसेच बालकाच्या पोषणाची स्थिती सुधारणे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) जी पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून ओळखली जात होती.ती मुळता: 2010 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही भारत सरकार द्वारे चालवली जाणारी एक मातृत्व लाभ कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 19 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ही योजना राबवली जाते तसेच बाळंतपणासाठी सशस्त्र रोख हस्तांतरण योजना आहे. ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे राबविली जाते.

रक्कम खात्यात जमा झाली की नाही ते कसे तपासणार?

  1. सर्वप्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmmvycas.nic.in ला भेट द्यावी.
  2. नंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.त्यात लॉगिन करायचं आहे. त्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  3. नवीन झाल्यानंतर पुढील भागावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.
  4. पुन्हा तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकून सर्चवर क्लिक करावे लागेल.
  5. क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस हा ऑप्शन तुमच्यासमोर येईल. त्यावर तुम्हाला मिळालेल्या हप्त्यांची संपूर्ण माहिती मिळेल.
  6. तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासून पाहू शकता.

पात्रता अटी आणि शर्ती

सुरुवातीला ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत आणण्यात आली होती. जेणेकरून कायद्यात नमूद केलेल्या रोख मातृत्व लाभाची तरतूद अमलात आणता येईल. त्यानंतर 19 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या गर्भवती स्त्रियांना या रोख हस्तांतरण लाभासाठी पात्र ठरविण्यात आले होते. जे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. तसेच ज्यांना पगारी प्रसूती रजा मिळते. त्या स्त्रियांना या योजनेतून वगळण्यात येते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा कायदा लागू झाल्यानंतर हे रक्कम सुधारित करून स्वरूपाचा आधार करण्यात आली आहे जी प्रत्येकी तीन हजाराच्या दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. हस्तांतरण खालील अटीच्या आधारित आहे.
<गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच अंगणवाडी केंद्रात गर्भधारणेची नोंद करा.
<कमीत कमी एक प्रसूतीपूर्व काळात उपस्थित रहा आणि आयर्न कॉलिंग ऍसिड च्या गोळ्या आणि TT1 टी टी चे इंजेक्शन घ्या.
<अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात किमान एक तपासणीसाठी उपस्थित रहा.
<दुसऱ्यांदा गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर झाल्यास ₹2000 हस्तांतरणासाठी किमान एक प्रसूतीपूर्व काळजी सत्र आणि TT2 ला उपस्थित रहा.
<तिसऱ्यांदा (प्रसूतीनंतर साडेतीन महिन्यांनी)₹2000 हस्तांतरणासाठी महिलेला हे करावे लागेल.
जन्म नोंदणी करा
बाळाला जन्माच्या वेळी बीसीजीचे लसीकरण करा. सहा आठवड्याने आणि दहा आठवड्यांनी ओपीव्ही लसीकरण करा.
प्रसूतीनंतर तीन महिन्याच्या आत किमान दोन वाढीचे निरीक्षण सत्र उपस्थित रहा.