पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची माहिती:
पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 हा एक सरकारी उपक्रम आहे. ही योजना भारत सरकारने तरुणांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला गती देण्यासाठी सुरू केली आहे.वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात नोकरी अधिक प्रगत तंत्रज्ञानाचे माध्यम बनत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात मात्र काही विद्यार्थी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरीच्या शोधात असतात पण समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा तंत्रज्ञानाच्या या युगात दहावी उत्तीर्ण तरुणांकडे चांगले कौशल्य नसल्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळत नाही. ही समस्या समजून घेऊन मोदी सरकारने PM Internship Scheme योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेत दहावी उत्तीर्ण किंवा त्याहून पुढील इयत्ता उत्तीर्ण झालेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची सरकार आणि नामांकित कंपन्यांकडून प्रशिक्षण दिले जाते. आणि त्यांना आर्थिक मदतही केली जाते. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा मेन उद्देश देशातील तरुणांना त्यांच्या शिक्षण आणि कौशल्याच्या आधारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रदान करणे हा आहे. हे तरुण ऑइल,गॅस अँड एनर्जी, बँकिंग सर्विसेस, ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी FMCG यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कोणताही अनुभव नसताना काम करू शकणार आहे.

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये:
- 21 ते 24 वर्षे वयोगटातील युवक युवतींसाठी खुली. किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- आर्थिक मदत: दरमहा ₹5000 स्टायपेंट आणि एक वेळची ₹6000 हजार
- कालावधी:बारा महिन्याचे इंटर्नशिप, ते तुम्हाला प्रत्यक्ष व्यवसायिक अनुभव मिळवून देईल.
- अर्ज प्रक्रिया: पूर्णपणे ऑनलाईन आणि मोफत. अधिकृत संकेतस्थळ :pminternship.mca.gov.in यावर लॉगिन करून आपला फॉर्म भरू शकता.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचे फायदे:
- आर्थिक मदत: मासिक स्टायपेंडसह आर्थिक आधार या योजनेअंतर्गत मिळू शकतो.
- कौशल्य विकास: प्रत्यक्ष उद्योग अनुभव आणि नवीन कौशल्यांची जोडही आपल्याला मिळणार आहे.
- करिअरमध्ये संधी:नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईन.
- नेटवर्किंग संधी: तज्ञांबरोबर काम करून भविष्यातील करिअर साठी संपर्क तयार करण्याचे संधी. यामुळे आपली नेटवर्क फील्ड मजबूत होते.
- प्रमाणपत्र: इंटर्नशिप पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल जे तुमच्या पुढच्या करिअरसाठी अधिक महत्त्वाचे ठरेल.
PM Internship Scheme अर्ज प्रक्रिया:
1. संकेतस्थळाला भेट द्या: pminternship.mca.gov.in.
2. नोंदणी करा: ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाने ओटीपी व्हेरिफाय करून नोंदणी करायची आहे.
3. फॉर्म भरा: वैयक्तिक माहिती व शैक्षणिक तपशील द्या.
4. इंटर्नशिप निवडा:तुमच्या आवडीच्या कुठल्याही तीन इंटर्नशिप प्रोग्राम तुम्ही निवडू शकता.
5. कागदपत्रे अपलोड करा: आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रे फोटो बँक तपशील इत्यादी माहिती भरणे गरजेचे आहे.
6. अर्ज सबमिट करा.आणि स्टेटस ट्रॅक करा!
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची पात्रता:
पीएम इंटर्नशिप योजना 2025 कोण अर्ज करू शकते? उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे.पूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षणात गुंतलेले नको.ऑनलाइन आणि दुरुस्त शिक्षण घेणारे तरुण अर्ज करू शकतात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकणार नाहीत. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची कायमस्वरूपी सरकारी नोकरी असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही. आयआयटी, आयआयएम, आय.आय.एस.ई.आर, एन.आयडी, आय.आय.आयटी, एन.एल.यू यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेणारे यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. सीए, सी.एम.ए, सीएम, एमबीबीएस, बी.डी.एस, एम.बी.ए आणि पदव्युत्तर पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. सरकारी योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनाही हा लाभ घेता येणार नाही.
इंटर्नशिप म्हणजे काय?
बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या योजनेच वैशिष्ट्य म्हणजे,की इथे आपल्याला अनुभव मिळतो.12 महिन्यांचा अनुभव येतो. पंतप्रधान इंटर्नशिप योजने अंतर्गत विम्याच संरक्षण दिलं जात.500पेक्षा अधिक कंपन्यांनी या योजनेत सहभागी झाले आहेत.इंटर्नशिप असा एक प्रोग्राम आहे ज्याच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये दोन, तीन, सहा महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा एक वर्षभर काम करून कामाचा अनुभव घेऊ शकतात. आणि हा अनुभव त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी प्लस पॉइंट ठरतो. थोडक्यात इंटर्नशिप म्हणजे एक प्रकारचा जॉब असतो.तुम्ही ज्या इंजीनियरिंग डिप्लोमा फिल्डमध्ये शिकत आहात त्या फिल्डमधील कंपनीमध्ये तुम्ही इंटर्नशिप करू शकता. काही इंटर्नशिप पार्ट टाइम पिरियड साठी असतात तर काही इंटर्नशिप फुल टाइम पिरियड साठी असतात. इंटर्नशिप ही हाय स्कूल स्टुडंट्स अंडरग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट स्टुडन्ट करू शकतात. इंटर्नशिप केल्यानंतर लगेच जॉब भेटत नाही जॉब मिळण्यासाठी बरोबर दिशा आणि ट्रेनिंग नक्कीच मिळते.
इंटर्नशिपचे प्रकार कोणते आहेत?
इंटर्नशिप केल्यामुळे विद्यार्थ्यांचा cv मजबूत होतो. इंटर्नशिप मुळे कम्युनिकेशन स्किल वाढते. इंटर्नशिप दोन प्रकारचे असतात. 1.paid internship
2.unpaid internship
पेड इंटर्नशिप मध्ये स्टुडंट्स त्यांनी केलेल्या कामाचे पैसे दिले जातात. आणि अनपेड इंटर्नशिप मध्ये पैसे दिले जात नाही.पेड इंटर्नशिप मोठी कंपनी किंवा मोठ्या ऑर्गनायझेशन कडून ऑर्गनाइस केल्या जातात.इंटर्नशिपचा अजून एक प्रकार असतो त्याला partially paid internship असे बोलतात. या इंटर्नशिपमधे स्टुडंट्सला केलेले कामाबद्दल ठराविक रक्कम दिली जाते त्याला स्टीपेंड असे म्हणतात.स्टीपेंड ही फिक्स एक अमाऊंट असते जी रेग्युलर बेसिसवर स्टुडंट्सला दिली जाते.
या इंटर्नशिपमधे तुम्हाला भारतातल्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. 31 मार्च ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.यामध्ये कुठल्याही प्रकारचा Interview होणार नाही. किंवा कोणती परीक्षा देखील घेतली जाणार नाही. कंपन्या कुठल्या असणार आहेत तर पहा वेबसाईटवर सर्व कंपन्यांची नावे दिली आहेत. आदित्य बिर्ला ग्रुप, टोयोटा, डीएलएफ, व्होल्टास, टाटा कन्सल्टन्सी अशा बऱ्याच कंपन्या आहेत. या कंपन्यांनमध्ये इंटर्नशिप केल्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. यामुळे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
PM Internship Scheme चा लाभ कसा मिळणार.
ही योजना डीबीटी आहे. लाभार्थ्यांना दर महिन्याला पाच हजार रुपये प्रमाणे एकूण बारा महिन्यांसाठी मदत दिली जाईल.
यातील पाचशे रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थीला कंपनीमार्फत त्यांच्या नियमानुसार सी एस आर फंड मधून देईल. चार हजार पाचशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे टाकले जातील. यासाठी आधार कार्ड व बँक खाते NPCI लिंक असणे गरजेचे आहे. जर एखाद्या कंपनीला लाभार्थ्याला 500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायची असेल तर ते स्वतःच्या फंड मधून देऊ शकतात.
नियमानुसार लाभार्थ्याच्या प्रशिक्षण प्रशिक्षणाचा सर्व खर्च कंपनी स्वतःच्या सीएसआर CSR फंड मधून करेल.
लाभार्थ्याने कंपनीचा इंटर्नशिप स्वीकारल्यावर कंपनी याची माहिती पोर्टलवर देईल मग प्रासंगिक अनुदान म्हणून प्रशिक्षणार्थ साठी रुजू झाल्यावर एकदाच 5000₹ शासन डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याला देण्यात येईल.
प्रशिक्षणार्थीची भूमिका व जबाबदारी:
- कंपनीच्या शिस्त वेळ नियम या सर्व अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
- जर सुट्टी दोन महिन्यांपेक्षा जास्त होत असेल तर प्रशिक्षण थांबावे लागते व पुन्हा नव्याने अर्ज करावा लागतो.
- वैद्यकीय आणीबाणीसाठी दोन महिन्यापर्यंत कंपनीच्या नियमानुसार सुट्टी घेता येते किंवा मंत्रालयाने दिलेल्या सूचनानुसार देखील सुट्टी घेता येते.
पंतप्रधान इंटर्नशिप योजना तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण कामाच्या ठिकाणाची समज आणि विविध क्षेत्रात रोजगारासाठी तयार करण्याची संधी देते.विद्यार्थी आणि तरुणांना व्यवहारिक ज्ञान आणि अनुभव देऊन त्यांची कौशल्य वाढवणे,त्यांना स्वावलंबी बनवणे, आणि रोजगाराचा चांगल्या संधी उपलब्ध करून देणे. ही योजना उद्योग आणि सरकारी क्षेत्रांशी जोडून देशाच्या विकासात तरुण प्रतिभांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करते. पंतप्रधान इंटरनॅशनल योजनेचे पोर्टल उघडल्यानंतर मोठ्या संख्येने कंपन्यांनी नोंदणी करून तरुणांना काम करून घेण्याची इच्छा व्यक्त केली.यात कृषी ऑटोमोबाईल आणि वोल्टास सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. गुजरात महाराष्ट्र उत्तराखंड आणि तेलंगणाच्या सात जिल्ह्यांसाठी तरुणांची मागणी केली जात आहे. सध्या एकूण सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.