Lek Ladki Yojana:(visit this side)
लेक लाडकी योजनेची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर 2023 मध्ये करण्यात आली.लेक लाडकी योजना एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना खास करून मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे काही गरीब मुलींना संपूर्ण शिक्षण पूर्ण करता यावं त्यामुळे त्यांचा लहान वयात विवाह केला जातो, या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने मुलीच्या उज्वल भविष्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे.

लेक लाडकी योजनेची माहिती:
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत 30 ऑक्टोबर 2023 ला जीआर काढण्यात आला होता. पहिली योजना होती.1 ऑगस्ट 2017 पासून सुरू होती जी माझी ‘ कन्या भाग्यश्री योजना ‘ ही जी योजना आहे तीच आता बदललेली आहे. आणि नवीन योजना म्हणुन लागू करण्यात आलेली आहे. 2023- 24 चे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे. आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे. आणि लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील. अशी ही योजना आहे. आणि याची घोषणा अगोदर करण्यात आली होती.
शासन निर्णय:
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित म्हणजे बंद करून राज्यात 1 एप्रिल 2023 पासून लक्षात ठेवा 1 एप्रिल, 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे:
लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे राहतील:
1.मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
2 मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
3 मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
4 कुपोषण कमी करणे.
5 शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती :
लेक लाडकी योजनाच्या अटी व शर्ती:
- लेक लाडकी योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1एप्रिल, 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी झाली तरी सुद्धा त्या मुलीला ही योजना लागू राहणार आहे.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/ पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मात्र अनुदेय राहणार आहे. मात्र त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करणं आवश्यक राहील.
- दिनांक 1 एप्रिल, 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुदेय राहिल. मात्र माता/ पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे इतर ऑपरेशन करणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे म्हणजे बँक खाते लागणार आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे, त्याची इथे मर्यादा आहे. एक लाखापेक्षा कमी असल पाहिजे. म्हणजे एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे एक लाखाच्या पेक्षा कमी जे काही उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न असल पाहिजे.
लेक लडकी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:
लेक लाडकी योजनासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत:
- लाभार्थीचा जन्माचा दाखला.
- लाभार्थीच आधार कार्ड( प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
- पालकांचा आधार कार्ड लागेल.
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1लाखापेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार अधिकारी यांचा दाखला आवश्यक आहे.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. बँकेचे पासबुक आहे त्याची प्रत लागेल. (झेरॉक्स)
- रेशन कार्ड लागेल.(पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला)
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (बोनाफाईड) तुम्ही देऊ शकता. मुलगी तुम्ही शाळेत घातल्यानंतर बोनाफाईड दिल जात.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. जे काही अठरा वर्षानंतर रक्कम भेटणार आहे तर विवाह झालेला नाही असे जे काही लाभार्थ्यांचे स्वघोषणापत्र ते सदर करणे आवश्यक आहे.अशा प्रकारचे हे दहा कागदपत्रे लागतात.
लेक लाडकी योजनेचे लाभ:
लेक लाडकी योजना.
लेक लाडकी योजनेद्वारे मिळणारे लाभ जाणुन घेऊ.
मुलीच्या जन्मानंतर _5000/- रुपये.
मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर _6000/- रुपये.
मुलगी इयत्ता सहावीत गेल्यानंतर_7000/- रुपये.
मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यानंतर_8000/- रुपये.
मुलीचे वय 18वर्षे पूर्ण झाल्यावर_75000/-रुपये.
असे मिळून 101,000रुपये मिळणार आहेत.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती:
लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील मुलीच्या जन्माची नोंद आधी करायची आहे. मग नोंद झाल्यानंतर तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला एक अर्ज नमुन्यासह सादर करायचा आहे. सेविकांकडं आणि ते नंतर सेविका अर्ज भरून घेतील. ते अर्ज पुढे पाठवतील त्याची जी कागदपत्राची छाननी असेल ती अंगणवाडीत पर्यवेक्षिका असतील, मुख्य सेविका असतील ते या कागदपत्राची पडताळणी नंतर होणार आहे. आणि एखाद्य कागदपत्र जर राहिलं तर तुम्हाला ते एक महिन्याच्या आतमध्ये देणं अनिवार्य राहील. याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे. पण जे अर्ज भरणार आहात ते अंगणवाडी सेविका भरतील. आपण जो ऑफलाइन अर्ज जो आहे तो जो अर्ज दिलेला आहे या जीआर मध्ये तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे भरून द्यायचा आहे.आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन नोंद आहे ते अंगणवाडी सेविका तथा पर्यावेशिका आहेत ते करणारे असे सांगण्यात आलेला आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाणार आहे. मात्र त्याकडे सादर करण्याचा जो अंतिम दिनांक राहणारे तो 31डिसेंबर 2023 पर्यंत राहणार त्यानंतर जे जे काही अर्ज आहेत.ते स्वीकारले जाणार नाहीत.
लेक लाडकी योजना ऑनलाइन अर्ज कसा भरावा:
- सर्वप्रथम तुम्हाला, लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
- फॉर्म डाऊनलोड झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढावी.
- नंतर त्यामध्ये आपली माहिती भरा. उदा. नाव, पत्ता, जन्मतारीख,आधारकार्ड इत्यादी.
- त्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती देखील भरा.
- फॉर्म वरती वर कोपऱ्याला लाभार्थी मुलगी व आई असा दोघींचा फोटो लावावा.
- अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडावी.
- अर्जामध्ये माहिती आणि कागदपत्रे जोडल्यानंतर, जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म जमा करा.
- लेक लाडकी योजनेच्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर सर्व माहिती योग्य आढळल्यास योजनेअंतर्गत पैसे आपल्या बँक खात्यात जमा केले जाईल.
महाराष्ट्र राज्यात सध्या सगळीकडे लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे मुलींना आर्थिक मदत मिळाली आहे. बऱ्याच अडाणी लोकांना या योजनेबद्दल माहित नाही. ही माहिती झाल्यानंतर लाभार्थी मुलींसाठी अर्ज नक्की भरा आणि सरकारच्या योजनेचा फायदा घ्या. योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे फक्त लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे कमी असावे. तरच त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक सुवर्णसंधी आहे.
लेक लाडकी योजनेच्या आतापर्यंत एक लाख 17 हजार 390 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. योजनेसाठी खर्च झालेला निधी 17 कोटी 40 लाख रुपये एवढा आहे. असं बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी सांगितलं आहे.