HMPV (human metapneumovirus) लक्षणे आणि उपाय जाणून घ्या.

What is HMPV:(visit this link)

एचएमपीव्ही व्हायरस नवीन नाही, जुनाच आहे. 2001 मध्ये नेदरलँड मध्ये पहिल्यांदा हा विषाणू माणसात आढळला. साधारण 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे या व्हायरसची उत्पत्ती झाली. तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केलेत. या विषाणूमुळे आता चिमण्यांना संसर्ग होत नाही. माणसांना याची लागण होऊ शकते हे 2001 मध्ये कळलं. आणि तेव्हापासून हा विषाणू अस्तित्वात आला. डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याकडे या व्हायरसचे 172 रुग्ण प्रयोगशाळांना आढळले असे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. Hmpv व्हायरसमुळे श्वसन भागांमध्ये संसर्ग होतो त्यामुळे सर्दी खोकला होतो.

HMPV ( human metapneumovirus)

एचएमपीव्ही आजाराचा प्रसार कसा झाला?

एच एम पीव्ही व्हायरसचा प्रसार कसा झाला ते जाणुन घेऊ.
संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वेगाने पसरवू शकतो.
संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा आहे.
लहान मुलं वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना लवकर संसर्ग होतो.
विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर निमोनिया देखील होऊ शकतो.

श्वसनातील थेंबाद्वारे प्रसार:संक्रमित व्यक्ती खोकल्यास किंवा शिकल्यास श्वसनातील थेंबाद्वारे एच एम पी व्ही पसरतो.दरवाजाचे हँडल फोन खेळणे यांसारख्या प्रदूषित पृष्ठभागाशी संपर्क आल्याने विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी.

  • वारंवार हात स्वच्छ धुवावेत डेटॉल किंवा साबणाने हात स्वच्छ करावे.
  • सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा.
  • महत्त्वाचे काम नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • हातात हात देऊ नका.
  • टिशू पेपर आणि रुमालाचा वापर करावा.
  • आजारी लोकांशी जास्त संपर्क ठेवू नका. त्यांच्याशी जास्त जवळीक साधू नका.
  • डोळे नाक आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
  • सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका. आपल्या वस्तू लोकांसोबत शेअर करायचा नाहीत. उदाहरणार्थ कपडे ,भांडी, ब्रश.
  • एचएमपीव्ही आजाराला घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. काळजी करू नका. असं तज्ञ सांगतात. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी बिंदासपणे वागु नये असेही तज्ञांनी सांगितले.

HMPV एचएमपीव्ही आजाराची लक्षणे जाणून घ्या.

  • ताप:सामान्यतः जाणवतो जो थंडी व घामा सोबत असतो.
  • खोकला:खोकला कोरडा किंवा कफयुक्त खोकला जो छातीत अस्वस्थता निर्माण करू शकतो छातीत कफ जाणवतो.
  • नाक बंद होणे: श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होते नाक बंद होते किंवा वाहते सहसा शिंका येण्यास सुरुवात होते.
  • घसा खवखवणे: घशात खवखव जाणवते ज्यामुळे गिळण्यास त्रास होऊ शकतो नाक बंद होते किंवापाणी वाहते.
  • जो एचएमपीव्ही आजार आहे हा न्यूमोनिया सारखाच आजार आहे.

Hmpv चे रुग्ण कोणकोणत्या ठिकाणी आढळून आले.

मुंबईत देखील एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला आहे मुंबईत सहा महिन्याच्या चिमुकलीची hmpv ची लागण झाली गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. सध्या याची मुरली वरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत मुंबई महापालिकेच्या परळमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयात मात्र अशी काही माहिती नसल्याचे सांगितलं पण तरी मुंबईकरांवर धोका असल्याचा सांगितलं जात आहे गुजरात केरळ कर्नाटक नागपूर आता मुंबईमध्ये रुग्ण सापडत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील एचएमटीव्ही व्हायरस बद्दल माहिती दिली ते म्हणाले आता लगेच घाबरून जायचे काही गरज नाही कोणी काहीही सांगतं या अफवांना बळी पडू नका जी अधिकृत माहिती तीचमाहिती माध्यमांनी पोहोचवली पाहिजे अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे आजार कोरोना सारखाच असल्याने सगळे सध्या सावध झाले आहेत एचएमटीव्ही आजार वाऱ्याच्या वेगाने भारतातही दाखल झालाय चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर अवघ्या 48 तासाच्या या आजाराचे रुग्ण भारतात सापडलेत त्यामुळे आजाराचे गांभीर्य वाढले एचएमपीव्हीच्या एन्ट्रीने पुन्हा मास्कची तयारी करावी लागणार आहे एच एम टीव्ही आजारामुळे जगभरात खळबळ माजली कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असताना नव्या विषाणूजन्य आजाराने एन्ट्री केली hmpv बाबत लोकांच्या मनात शंभर प्रश्न निर्माण झालेत.भारत,मलेशिया, हॉंगकॉंग आणि युरोपातील काही देशांमध्ये हा व्हायरस पसरल्याची माहिती आहे.

कोरोना सारखा हा आजार जीवघेणा आहे का?

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना एचएमपीव्हीची लागण होऊ शकते का? उत्तर हो. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या ना ही या आजाराचा धोका आहे.कोरोना सारखा हा आजार जीवघेणा आहे? का उत्तर कोरोना एवढा हा आजार घातक नाही.एचएम पीव्हीचा आजार कोणा कोणाला जास्त आहे? उत्तर एचएमपीव्हीचा धोका लहान मुलं आणि व्याधीग्रस्तांना आहे. तसेच जर तुम्ही 65 वर्षाच्या वरती असाल व तुम्हाला जर डायबिटीज, बीपी असेल आणि जर तुम्हाला लग्नात महा कुंभमेळ्यात अशा गर्दीच्या ठिकाणी जर जायचे असेल तर तुम्ही जाताना मास्क वापरा जर तुम्हाला अगोदरच सर्दी खोकला आहे अशा ठिकाणी जाणं टाळा वारंवार हात धुवा सर्दी खोकला ताप असल्यास डॉक्टरांना भेटा या चार गोष्टी चे जरी पालन केले तरी आपण या आजारावर अटकाव आणू शकतो.

आरोग्य विभागाने hmpv बद्दल काय प्रतिक्रिया दिली.

एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मध्ये आहे. व्हायरस संदर्भात दोन दिवसात बैठक घेऊन सूचना दिल्या जातील .प्रकाश आंबेडकरांनी अशी माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात एचएमपीव्ही व्हायरस विषाणू वेगाने पसरत आहे लहान मुले अधिकाधिक याला बळी पडत आहेत. भारतात बंगळुरूंमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. आठ महिन्याच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एचएमपीव्ही विषाणू ने चीनमध्ये किती धुमाकूळ घातला आहे हे लक्षात येत आहे. इतके लोक या विषयांना बळी पडत आहेत की रुग्णांसाठी बेडचा तुटवडा निर्माण होत आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी एचएमटी विषाणूचा सामना करण्यासाठी independent.co.uk वेबसाईट नुसार काही प्रोटोकॉल लागू केले आहेत. मात्र याबाबत कोणतेही आपत्कालीन स्थिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. एचएम पी व्ही हा व्हायरस pneumoviridae कुटुंबातील आहे. या विषाणूमुळे श्वसन क्रिया संक्रमण होते हा रोग सामान्यतः सौम्य असतो.

एचएमपीव्हीचे निदान कसे केले जाते.

रुग्णाला आढळून येणारी लक्षणे व प्रयोगशाळेतील चाचणी यावर आधारित एचएमपीव्हीचे निदान करण्यात येते. निदान करण्यासाठी मऊ स्टिक वापरून नाकाच्या मागील बाजूस किंवा घशाच्या मागील बाजूस स्वॅब करून ही चाचणी करण्यात येते. सामान्यता रुग्णांना दिसणारी लक्षणे गंभीर दिसून येत नाही तोपर्यंत रुग्णांची एचएमपीव्हीची चाचणी केली जात नाही. निदानाची पुष्टी करण्यासाठी या नमुन्यात एचएमपीव्ही विषाणूची चाचणी केली जाते. आरोग्य सेवा कर्मचारी फुफ्फुस आणि श्वसन मार्गातील गुंतागुंत शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे देखील करतात.

Hmpv उपचार.

निरोगी व्यक्तींमध्ये विश्रांती व रोग प्रतिकारक शक्तीच्या नैसर्गिक कृतीने एच एम पी व्ही संसर्ग सामान्यता बरा होतो. अशा प्रकरणांमध्ये उपचार हा आराम देण्यासाठी केला जातो. रुग्णांचा घसा खवखवत असेल किंवा खोकला व घरघर करत असेल तर तात्पुरते इन्हेलर दिले जाऊ शकते. एचएमपीव्हीवर उपचार करण्यासाठी कोणतीही अँटीव्हायरल औषधे उपलब्ध नाहीत. खूप गंभीर लक्षणे आढळल्यास किंवा जास्त त्रास होऊ लागल्यास रुग्णाला रुग्णालयात नेऊन दाखल करावे लागते.

एचएमपीव्ही पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी

या आजाराची चांगली गोष्ट अशी आहे की एचएमपीव्ही हा आजार कोविड-19 इतका संसर्गजन्य नाही. व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण काय काळजी किंवा खबरदारी घेऊ शकतो. आपल्याला आधीच परिचित आहेत.

  • तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. -तुमचे नाक,डोळे किंवा तोंडाला स्पर्श करू नका. जर तुम्हाला एचएमपीव्ही असेल तर ते तुमच्या तोंडातील व नाकातील थेंबा मधून तुमच्या हातात पसरू शकते. आणि नंतर इतरांमध्ये पसरू शकते. संसर्ग तुमच्या हातातून चेहऱ्यावर पसरू शकतो.
  • हात वारंवार धुवा.- हँडवॉश आणि साबणाने नियमितपणे हात धुवा. किमान 30 सेकंद हात धुतले पाहिजे. जर तुम्ही बाहेर असाल तर अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरू शकता
  • वैयक्तिक वस्तू दुसऱ्यांना देने टाळा. – कोणत्याही संक्रमित रुग्णा सोबत किंवा बाहेरील अनोळखी व्यक्ती सोबत पिण्याचे ग्लास, भांडी किंवा इतर वस्तू शेअरकरणे टाळा.
  • पृष्ठभाग निर्जंतुक करा.- तुमच्या घरात कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत तुम्ही ज्या भागांना वारंवार स्पर्श करता ते नियमितपणे निर्जंतुक केले पाहिजे. यामध्ये फोन, खेळनी, पुस्तके व दरवाजाची नॉब, लाईट स्विच यांचा समावेश होतो.
  • मास्क घाला.- गर्दीच्या ठिकाणी व बाहेर असताना हवेतून पसरणाऱ्या आजारांपासून आणि धुळीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क लावणं ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुम्हाला जर संसर्ग झाला असेल तर तो आजूबाजूच्या लोकांना होऊ नये म्हणून मास्क घालने गरजेचे आहे.

जर घरातील मुलांना एचएमपीव्ही असल्याची शंका असल्यास काय काळजी घ्यावी?

जर तुमच्या मुलांना सामान्य सर्दी आणि खोकल्याची लक्षणे आढळली तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्याला HMPV असल्याचा संशय येऊ शकतो.अशावेळी तुम्ही ताबडतोब बाल रोग तज्ञांचा सल्ला घ्या.शाळेत दुसऱ्या मुलांना संसर्ग होऊ नये म्हणुन त्याना घरी ठेवा.जर तुमच्या घरी वृद्ध आजी आजोबा असेल तर त्यांच्यापासून तुमच्या मुलांना दूर ठेवा.त्यानां अंथरुणावर झोपायला लावा.तसेच त्यांचे हात धुन्याचे आणि अनावश्यक पृष्ठ भागाला स्पर्श करण्याचे महत्त्व त्यांना सांगा.तसेच टॉवल, बेडशीट, खेळणी, चमचे यांसारख्या स्पर्श करणाऱ्या वस्तूंना स्वच्छ करा. तसेच मुलांना मास्क लावायला सांगा व आपणही खोलीत प्रवेश करताना मास्क घालून प्रवेश करा.मुलांची खोली स्वच्छ व हवेशीर ठेवा.तसेच मुलांना सांगा घाबरुन जाण्याची गरज नाही. तुम्ही सहज बरे होऊ शकता.तसंच तुम्ही दर तासाला त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण उचित आहे.जर त्यांची लक्षणे किंवा तब्येत बिघडली तर बालरोग तज्ञांना कॉल करा. आणि त्यांना सर्व परिस्थितीची माहिती द्या.आवश्यकता असल्यास रुग्णालयात कधी आणायचे ते सांगतील.