Hyderabad Forest News| तेलंगणामध्ये जंगलतोड का केली जात आहे?

हैदराबाद शहराच्या मध्यभागी वसलेले जंगल:

Visit This Official Website:

कांचा जंगल हैदराबादच्या मध्यभागी सुमारे 400 एकर क्षेत्रात वसले आहे. जे ग्रीनलँड आहे त्यात भरपूर झाडे आणि वनस्पती आहे. जे अनेक प्राणी आणि पक्षांचे निवासस्थान आहे. कांचा हैदराबादचे फुफ्फुस म्हटले जाते. शेकडो अंतरावर पसरलेले हे जंगल रात्रीच्या अंधारात शांतपणे कापले जात होते. असे म्हटले जात आहे, की झाडे तोडण्याची कारवाई अशा वेळी सुरू झाली जेव्हा सलग सुट्ट्या होत्या. आणि हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी घरी गेले होते. हा परिसर विद्यापीठाजवळ आहे. आणि विद्यार्थी जंगल तोडीचा निषेध करत होते. स्थानिक लोक पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थी कांचा जंगलतोड आणि विकास कामे थांबवण्याची मागणी करत आहे. त्यांचं म्हणणं अस आहे की ते राष्ट्रीय उद्यान घोषित केले पाहिजे. कारण ते 455 अधिक प्रजातींचे घर आहे. जेव्हा हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली की येथील जंगल साफ करून विकासकाम सुरू केले जाणार आहे, तेव्हा त्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. तेथे जंगल तोडून इमारती बांधल्या जातील असे सांगितले जात आहे. विकास प्राधिकरणाने हे जंगल तोडण्यासाठी सुट्टीचा काळ निवडला होता. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रात्रीच्या अंतरात एकाच वेळी अनेक बुलडोझर आणि कटिंग मशीन वापरून जंगल साफ केली जात होते. त्यामुळे तिथे राहणारे मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी त्यांचे घर उध्वस्त होताना पाहून जणू काही माणसांप्रमाणे ओरडत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार वायरल होत आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने विद्यार्थी आणि पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था व फाउंडेशन आणि दाखल केलेले याचिकांवरून त्यांच्या गचीबोवली येथील 400 एकर पेक्षा जास्त जमिनीवरील विकास कामांवर अंतरिम स्थगिती लागू केली आहे. गुरुवारी होणाऱ्या पुढील सुनावणी पर्यंत आदेश लागू राहील.

Hyderabad Forest News| तेलंगणामध्ये जंगलतोड का केली जात आहे?

कांचा गचिबोवली चारशे एकर जमिनीचा वाद अनेक दशकांपासून प्रलंबित!

1975 साली ही जमीन आपल्याला मिळाल्याचा दावा हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाने केला होता.तेलंगाना उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. आणि जमीन हस्तांतरणाची कागदपत्र नसल्याने ही जमीन सरकारची असल्याची पुष्टी कोर्टाने दिली. तत्कालीन सरकारने 2004 साली या जमिनीचा एका खाजगी कंपनीसोबत करार केला होता. त्यानुसार मागच्या वर्षी पाहणी करून आयटी पार्क साठी काही दिवसांपूर्वी ही जमीन मोकळी करण्यास सुरुवात झाली. एकीकडे आधीच पर्यावरण प्रेमींनी या जमिनीला राष्ट्रीय उद्यान घोषित मागणी केलेली असताना इथे हजारो झाडांची कत्तल सुरू झाली. या विरोधात पर्यावरण प्रेमी सोबतच हैदराबाद विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी या जंगल तोडीचा विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी ही आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्नही केला. यात हस्तक्षेप करत काम थांबवले. सध्या हे जंगल तोड थांबली असली तरी पक्षांचा हा आक्रोश त्यांच्या डोळ्यातील ही भीती अजूनही गेले नाही. कारण तेलंगणा सरकार हे जंगल हटवून आयटी पार्क उभारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे हैदराबादच्या या जंगलात जंगलातल्या वन्यजीवांना खरच न्याय मिळणार का त्याचं घर राहणार का? यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि झटापट

30 मार्च रोजी सकाळी जेव्हा अनेक बुलडोझरांनी झाडे तोडायला सुरुवात केली,तेव्हा विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले. ते बुलडोझर वर चढले, घोषणा केल्या आणि काम थांबवण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे दोघांनमध्ये तीव्र झटपट झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना ओढून व्हॅन मध्ये बसवलं आणि जवळपास 53 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल. विरोधी पक्ष बीआरएसने आरोप केला की पोलिसांनी लाठया वापरून काही विद्यार्थ्यांचे कपडे फाटल्याचही समोर आल आहे. परंतु पोलिसांनी हे आरोप नाकारले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आल आहे. काही विद्यार्थ्यांवर पोलिसांवर हल्ला केला जात आहे. व त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hyderabad forest news: नक्की काय आहे प्रकरण|

तेलंगणात वन्य प्राण्यांचा आक्रोश हैदराबाद येथील 400 एकर जंगलावर बुलडोझर. जीव वाचवण्यासाठी प्राण्यांचा आकांत रात्रीच्या अंधारात बुलडोझरच्या मोठ्या रांगा.बघता झाडांच्या कत्तली करणारे बुलडोझर आणि रात्रीच्या अंधारात वाट दिसेल तिथे धावणारे वन्यप्राणी दिसून आहेत येत आहे.कालपर्यंत जे जंगल शांत होतं हिरवागार होतं. त्या जंगलात आज प्राण्यांच्या काळजात धडकी भरवणारा गोंगा पाहायला मिळतोय. बगाव इकडे झाडांची प्रेत पडलेत प्राणी पक्षाचे निवारे जमीन दोस्त झाले. आपले घर नष्ट झालेले प्राणी पक्षी सैरावैरा धावत आहेत. रडलेला नजरेने आपलं घर तुटताना पाहत होते. हे चित्र आहे.तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद शहराच्या मधोमध असलेल्या घनदाट चारशे एकरातल्या जंगलात सध्या लाखो झाडं, हजारो प्राणी, पक्षांच्या निवासस्थान पाडून सिमेंटचा जंगल उभारण्याचा घाट येथे घालण्यात गेला. याला पर्यावरण प्रेमी सह हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही विरोध केला तेलंगणा उच्च न्यायालयाने सर्व काम तात्पुरता थांबवण्याचे आदेश दिले.

भाजपचे तजिंदर बग्गा राहुल गांधीवर निशाणा;

तेलंगणातील कांचा गचिबोवली येथे झालेल्या जंगलतोडीवरून भाजपचे नेते तजिंदर बग्गा यांनी राहुल गांधींवर होर्डिंग लावून निशाणा साधला. तेलंगणाच्या मुख्य सचिवांना कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला तसेच सर्वोच्च न्यायालयाने जंगल तोड थांबवली.BJP नेते तजिंदर बग्गा यांनी (kancha Gachibowli Forest) परिसरात सुरू असलेल्या जंगलतोडीवरून तेलंगणा (Tree Felling)लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर उघड टीका केली आहे. ताजिंदर बग्गा यांनी एक तीव्र राजकीय पाऊल उचलले आहे. तसेच त्यांनी दिल्लीवर होर्डिंग लावले आहेत आणि त्यात थेट आव्हान केले जात आहे की राहुल गांधीजी कृपया तेलंगणा मधील आमचे जंगल तोडणे थांबवा हे होर्डिंग हैदराबाद विद्यापीठाजवळ मोठ्या प्रमाणात वृक्षतोड महिने चा संदर्भ देतात ज्यामुळे पर्यावरणवादी आणि जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे हैदराबाद मधील या जंगलाच्या समृद्ध हिरवळीमुळे आणि वन्यजीवांच्या उपस्थितीमुळे लक्ष वेधले जात आहे.

जंगलतोड प्रकरणाची सुरुवात कधी आणि कशी झाली?

तेलंगणातील जंगलतोड प्रकरणाची सुरुवात 30 मार्च 2025 रोजी झाले तेलंगणा सरकारने हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या जवळील कांचा गाचिबोवली परिसरातील चारशे एकर जमीन साफ करण्यासाठी बुलडोझर पाठवले होते. तेलंगणा राज्य औद्योगिक सुविधा TSIIC च्या माध्यमातून ही जमीन पायाभूत सुविधा व आयटी पार्क साठी वापरण्याचा सरकारचा उद्देश होता. सरकारने दावा केला की, ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. आणि ती जंगलाचा भाग नाही, पण या परिसरात जैवविविधतेने समृद्ध असा परिसर आहे. या 450 हून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत.त्यात मोर, हरण, हत्ती आणि अनेक पक्षी सामील आहेत.

गुरुवारी 3 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला कांचा गचिबोवली वन क्षेत्रातील जंगल तोंड थांबवण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी मध्ये या 400एकर वनजमिनीचा लिलाव तेलंगणा सरकारने केला होता.

सरकारला ही जमिन इतकी महत्त्वाची का आहे?

सरकारला ही जमिन खुप महत्त्वाची वाटते. कारण तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्हाच्या कांचा गचिबोवली इथ असणाऱ्या चारशे एकर जमिनीच ऑक्शन करण्यासाठी तेलंगणा सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे या जमिनीच्या माध्यमातून तेलंगणा सरकारला मिळू शकणारा पैसा. राज्याच्या इकॉनॉमिक ग्रोथचं जे टार्गेट सरकार पुढे आहे ते पूर्ण करणं आणि लोकांना दिलेली आश्वासन पूर्ण करणं. रेवंत रेड्डी सरकारसाठी गरजेचे आहे. अशा सरकारला राज्याचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका प्राईम लोकेशनवर म्हणजेच कांचा गाचिबोवली इथं 400 एकरची जमीन मिळाली. या ठिकाणी आयटी कॉरिडॉर आहे. त्यामुळे आपोआपच या जमिनीचं महत्त्व वाढलं त्यामुळं ही जमीन विकली तर सरकारला कमीत कमी 10 ते 15 हजार कोटी ते जास्तीत जास्त 25 ते 30 हजार कोटी पर्यंतचा रेव्हेन्यू मिळू शकतो.असा अंदाज बांधला जातोय या सगळ्या आर्थिक रेव्हेन्यू मधून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल यासोबतच आयटी इप्रास्ट्रक्चर, आयटी पार्क निर्माण होतील.