Ghibli Explained:घिबली आहे तरी काय? फोटो अपलोड करत असाल तर सावधान!

Ghibli स्टाईल फोटो अपलोड करण्यापूर्वी ही माहिती जाणून घ्या.

Ghibli आजकाल सोशल मीडियावर नवीन ट्रेंड चालू आहे. घिबली स्टाईल मध्ये आपले फोटो बनवण्याचा नेता असो किंवा सेलिब्रिटी सगळेजण आपले AI जनरेटेड घिबली स्टाईल वाले फोटो खूप शेअर करत आहेत. ह्या AI जनरेटेड फोटोंच आकर्षण खुप वाढत चाललं आहे.मजेशीर वाटत आहे. हा तितकाच हा ट्रेंड धोकादायक ठरू शकतो.लोक फक्त Chat GPT नाहीतर अनेक वेगळ्या टूलचा वापर करून AI फोटोस बनवत आहेत. तर तुम्ही कधी विचार केलाय का? हे फोटो कुठे साठवले जातात. या ट्रेंडचा हिस्सा बनुन विचार न करता आपले फोटो शेयर करणे सुरक्षित आहे का?AI टेक्नॉलॉजीला हलक्यात घेण्याची चूक कधी करू नका. विचार न करता कोणत्याही AI टूलवर फोटो टाकणं तुम्हाला धोक्यात आणु शकते. याच्या आधी क्लीयर व्युव AI नावाचा कंपनीवर परवानगी न घेता सोशल मीडियावर 3अरब फोटो चोरण्याचा आरोप लावला गेला होता. मे 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आऊट ऑफ कंपनीचा डेटा लीक झाला. ज्यात 10लाखापेक्षा जास्त लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स अन्य डेटा चोरी झाला. आपल्या फोटोवरून दुसरे लोक पैसा कमावत आहेत. आपल्या फोटोंचा वापर आपल्याला न विचारता चुकीचा मार्गासाठी केला जाऊ शकतो. फक्त टेक्नॉलॉजी नाही तर आपल्याला पण स्मार्ट बनायला हवं.AI मुळे जीवन सोपे बनवलं जात आहे पण ते आपल्याला धोक्यात पण घालू शकते.

Visit this official website:

Ghibli Explained:घिबली आर्ट आहे तरी काय?

Gibali Art पडणार महागात? आपले फोटो जातात कुठ……

सोशल मीडियावर असंख्य नवीन नवीन ट्रेंड येत असतात. आणि याच ट्रेंडच्या वाहत्या गंगेत अनेकजण आपले हात धुऊन घेतात. एखादा नवीन ट्रेंड आला की त्याला फॉलो करणारे असंख्य लोक असतात. सध्या असाच एक ट्रेंड चालू आहे तो म्हणजे जिबली आर्ट ट्रेंड. तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो AI जिबली स्टाईल टूलमध्ये अपलोड केला की अवघ्या काही सेकंदांमध्येच त्याला जिबली स्टाईल ॲनिमेटेड फोटो तयार होतो. हे फोटो इतके सुंदर असतात की आपण सुद्धा त्या ट्रेंडमध्ये सहभागी होऊ असे आपसूकच इच्छा होते, परंतु तुम्ही विचार केलाय का तुम्ही अपलोड केलेले प्रायव्हेट फोटो नेमके जातात कुठे? तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुमचे फोटो सर्रास त्या ॲप सोबत शेयर करता पण तुमचे प्रायव्हेट फोटो AI प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जातात. आणि भविष्यात ते कसे वापरले जाऊ शकतात तुम्हाला माहितीये का?

Chat GPT आणि ग्रोक या प्लॅटफॉर्म द्वारे सुरू झालेले ट्रेंडमधील लोकांनी आपले अनेक फोटो अपलोड केले आहेत यात सेलिब्रिटी सुद्धा अपवाद नाही. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री यांनी देखील आपला फोटो या Art मध्ये अपलोड केला होता. महाराष्ट्र राज्यात असंख्य लोक या आर्ट मध्ये जीबली स्टाईल फोटो अपलोड करतात. या ट्रेंड मध्ये फोटो शेअर करताना कोणत्या डिजिटल प्रायव्हसीची काळजी घेतली जात नाही. याचा विचार आता नेटकऱ्यांनी करायला हवा. तुम्ही या AI टूलवर फोटो शेयर करता तो प्लॅटफॉर्म किंवा तुमचे फोटो साठवत नाही तर त्याचा प्रशिक्षणासाठी त्या फोटो चा वापर करतात. सायबर एक्सपर्ट आधीच या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त करत आहे. पण जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल AI तुमचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवणार का?तर त्या बद्दल स्वतः AI काय म्हणते हे सुद्धा पाहुया, खर तर chat GPT ला या संदर्भात प्रश्न विचारला गेला की घिबली आर्ट बनवण्यासाठी अनेक खासगी फोटो बनवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत त्यावर हे फोटो साठवले जात आहेत का?AI ने या ट्रेंडला फक्त असुरक्षित असल्याचं म्हटलं नाही तर तुमचा खासगी डेटा तिथे साठवला जात असल्याचं सांगितलं जात आहे.

घिबली फोटो बनवणे हा एक स्कॅम?

  • सध्या जिबली स्टाईल AI इमेज क्रिएट करण्याचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे.
  • सध्या सायबर गुन्हेगारांची नजर जिबली स्टाईल फोटो क्रिएट करणाऱ्या युजर वर आहे. हा फोटो तयार करण्यासाठी युजर वेगवेगळ्या वेबसाईटवर आपले फोटो, आपला पर्सनल डेटा शेअर करत आहे.
  • तुमच्या फोटोंचा चुकीच्या ठिकाणी वापर करू शकतात. Chat GPT वगळता अनेक वेबसाईट एप्लीकेशन Ghibli फोटो बनण्याच्या दावा करतात. आणि इतर वेबसाईटवर जर तुम्ही तुमचा फोटो व इतर डेटा शेअर करत असाल तर हा डेटा चोरून सायबर गुन्हेगार तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकतात.
  • यावरून तुमचा फोन सहज हॅक केला जाऊ शकतो आणि त्यानंतर तुमचा फोनवरून यूपीआय पेमेंटचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो.

घिबली म्हणजे काय? हे नाव कोणी दिलं?

AI जनरेटेड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. आतापर्यंत हे फोटो अनेकांनी नक्कीच पाहिले असतील, तुमचे स्वतःचे सुद्धा असतील. सोबत एक शब्द पण वाचला असेल घिबली आर्ट. सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल Chat GPT हे लेटेस्ट फिचर्.Chat GPT स्टुडीओ आर्टने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर कुठेही जा इथे घिबली आर्ट चे फोटो बनत आहे.घिबली हा शब्द लिबियन अरेबिक शब्दापासून आलाय याचा शब्दशः अर्थ होतो उष्ण वाळवंट. पण घिबली हे एका जपानी ॲनिमेशन स्टुडिओच ही नाव आहे. या स्टुडिओ ने बनवलेल्या या ॲनिमेशन ला घिबली आर्ट असे म्हणतात. याची ज्याने सुरुवात केली त्याचं नाव मीया जाकी ते या स्टुडिओचे CO फाउंडर आहे. घिबली हे नाव एका इटालियन एअरड्राफ्टचे टोपण नाव होतं. मीया जाकी यांना एयरड्राफ्टची प्रचंड आवड होती.त्यामुळे त्यांनी आपल्या स्टुडिओच नाव घिबली असे ठेवले. मिया जाकी हे एक जपानी ॲनिमेट डायरेक्टर आहेत. त्यांनी 1963 मध्ये कोईदांगा स्टुडिओमध्ये ॲनिमेटर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.

सुजिकी, तोशियो यांच्यासोबत मिळून जून 1985 मध्ये घिबली स्टुडिओची स्थापना केली. ही कंपनी हाताने काढलेले ॲनिमेशन हाय क्वालिटी फिल्म मेकिंग आणि वेब स्टोरी साठी ओळखले जाते. घिबली स्टुडिओने आतापर्यंत nighbor totoro,spirited away,kikis belivery service अशा अनेक ॲनिमेटेड मुव्हीज बनवल्या आहेत. ऑल टाइम बेस्ट कलेक्शन मध्ये जपानच्या टॉप 10 मुव्हीज मध्ये. घिबली स्टुडिओच्या चार मूव्हीजचा समावेश होतो. पण जपानची ही कंपनी अनेक वर्षापासून बनवत असलेल्या ॲनिमेशन आर्ट आता एवढं का चर्चेत आलं तर याचं कारण आहे Chat GPT ओपन AI कंपनीने नुकतेच Chat GPT चे हे एक नेटिव इमेज जनरेशन फीचर लॉन्च केले. हे फीचर वापरून यूजर घिबली स्टाईलचे इमेज तयार करू शकतात. सध्या हे फीचर फक्त Chat GPTच्या प्रीमियम वर्जन मध्येच उपलब्ध आहे.AI चे CEO सॅम आवटमन यांनी दिलेला माहितीनुसार फ्री युजर साठी हे फीचर उपलब्ध व्हायला आणखी थोडा वेळ लागेल.

घिबली आर्ट इमेज बनवायचे कसे?

तुम्ही Art Image बनवण्यासाठी तुम्ही Chat GPT च्या प्रीमियम मॉडेलचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फोनवर Chat GPT ओपन कराव लागेल. त्यानंतर तिथे दिसणाऱ्या प्लस चिन्हावर क्लिक करा. तिथे तुम्हाला फोटो नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या फोटोची घिबली आर्ट इमेज बनवायची तो फोटो निवडा. एक फोटो अपलोड झाला की तुम्हाला प्रॉम्प्ट इंटर करावे लागतील.तुम्ही यासाठी make it in to anime frame, can you turn into a ghibli style photo?show mein studio ghibli style किंवा how would ghibli sketch my features असे promt वापरू शकता.he प्रॉम्प्ट वापरले की तुमचे घिबली स्टाईल फोटो क्रिएट होतील.पण Chat GPT च प्रिमियम मॉडेल वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 1800₹खर्च करावे लागतात. पण असेही काही टूल्स आहेत की ज्याद्वारे तुम्ही Chat GPT चा वापर न करता ghibli art images क्रिएट करू शकता.pre Ghibli Art Image बनवण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे Grokes AI.

Grok हे Chat GPT प्रमाणेच चाटबाँड आहे. यात तुम्ही Chat GPT मध्ये वापरलेले चॅट वापरुन फ्री मध्ये Ghibli Art Image तयार करू शकतात. याची पण प्रोसेस सारखीच आहे आणखी एक टुल आहे त्याचं नाव Midjourey इथे तुम्ही Ghibli इमेज ची बेस्ट कॉलेटी मिळवण्यासाठी Ghibli inspired, hayao, miyazak असे कीवर्ल्ड वापरू शकता.हे टुल paid असल तरी त्याची किंमत Chat GPT पेक्षा बरीच कमी आहे. हे टुल वापरण्यासाठी तुम्हाला जवळपास सातशे रुपये द्यावे लागतील याशिवाय Leonardo AI हे पण एक टुल आहे. याचा वापर करून तुम्ही घिबली आर्ट इमेज तयार करू शकता. जपान मधला घिबली स्टुडिओ अशा प्रकारचे AI Animation बऱ्याच वर्षापासून बनवतोय. पण Chat GPT सारख्या AI मुळे ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांच्या हातात आलीय.

घिबली स्टाईल फोटो अपलोड करण्यापूर्वी ही माहिती जाणून घ्या.

Ghibli आजकाल सोशल मीडियावर नवीन ट्रेंड चालू आहे. घिबली स्टाईल मध्ये आपले फोटो बनवण्याचा नेता असो किंवा सेलिब्रिटी सगळेजण आपले AI जनरेटेड घिबली स्टाईल वाली फोटो खूप शेअर करत आहेत. ह्या AI जनरेटेड फोटोंच आकर्षण खुप वाढत चाललं आहे.मजेशीर वाटत आहे हा तितकाच हा ट्रेंड धोकादायक ठरू शकतो.लोक फक्त Chat GPT नाहीतर अनेक वेगळ्या टूलचा वापर करून AI फोटोस बनवत आहेत. तर तुम्ही कधी विचार केलाय का? हे फोटो कुठे साठवले जातात. या ट्रेंडचा हिस्सा बनुन विचार न करता आपले फोटो शेयर करणे सुरक्षित आहे का?AI टेक्नॉलॉजीला हलक्यात घेण्याची चूक कधी करू नका. विचार न करता कोणत्याही AI टूलवर फोटो टाकणं तुम्हाला धोक्यात आणु शकते. याच्या आधी क्लीयर व्युव AI नावाचा कंपनीवर परवानगी न घेता सोशल मीडियावर 3अरब फोटो चोरण्याचा आरोप लावला गेला होता. मे 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आऊट ऑफ कंपनीचा डेटा लीक झाला. ज्यात 10लाखापेक्षा जास्त लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स अन्य डेटा चोरी झाला. आपल्या फोटोवरून दुसरे लोक पैसा कमावत आहेत. आपल्या फोटोंचा वापर आपल्याला न विचारता चुकीचा मार्गासाठी केला जाऊ शकतो. फक्त टेक्नॉलॉजी नाही तर आपल्याला पण स्मार्ट बनायला हवं.AI मुळे जीवन सोपे बनवलं जात आहे पण ते आपल्याला धोक्यात पण घालू शकते.