छावा चित्रपट नवा इतिहास रचणार
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचन्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच 500 कोटींची पुढे कमाई करणार आहे. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा छावा चित्रपट कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरुन गेलंय. अभिनेता विकी कौशल च्या छावा चित्रपटांन पहिल्या दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठला. अभिनेता विकी कौशल यांने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई ची भूमिका साकारली आहे. छावा चित्रपटांन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत पहिल्याच दिवशी एकतीस कोटीचा गल्ला जमावला. छावाच्या यशाची कारण काय आहे? लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केल आहे. छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय 130 कोटी खर्च करून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरानी शिवाजी सावंताच्या छावा कादंबरीवर आधारित छावा हा चित्रपट बनवला. छावाच्या ५लाख तिकिटांच्या ॲडव्हान्स बुकिंग मधूनच 13 कोटी 70 लाखांची कमाई झाली एवढेच नाही तर पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारा छावा चित्रपट पहिल्याच आठवड्यात २००कोटीचा आकडा पार केला आहे.

कोणत्या आठवड्यात किती कमाई केली पाहून घेऊ.
पहिल्या आठवड्यात_ 219.25cr.
दुसऱ्या आठवड्यात _ 180.25cr
तिसऱ्या आठवड्यात_ 84.05cr.
चौथ्या आठवड्यात _55.95cr.
पाचव्या आठवड्यात_23.77cr.
प्रेक्षकांवर छावा चित्रपटाची जादू चढली आहे. तसेच छावा चित्रपटाने गदर 2 च्या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे. 563 करोड पेक्षाही जास्त कमाई छावा चित्रपटाने केली आहे.
छावा चित्रपट बनवण्यासाठी अंदाजाने १३० कोटी रुपये लागले होते असे म्हटले जाते. छावा चित्रपटाच्या निर्मितीसाठी 130 कोटी रुपये खर्च करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटीची कमाई केल्याने पहिला चार दिवसातच बजेट वसूल झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केल आहे. विकी कौशल, रश्मिका मंदांना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत.
जिथं सिंहाचा छावा कैद झाला त्या वाड्याचं वास्तव काय?
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या संभाजी राजेंच्या मृत्यू प्रसंगावेळी सिनेमागृहात अनेकांना अश्रू अनावर झाले. इतिहासात दुर्लक्षित राहिलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची ज्या प्रकारे हत्या झाली. छावा चित्रपटातला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात संभाजी राजांचा शेवट पाहून काळीज हादरत. ज्या संगमेश्वर मध्ये मोघलांना संभाजी राजांना कैद केले तो संघमेश्वरातला वाडा ही व्हायरल होतोय. यात सरदेसाईवाड्याची दृश्य वायरल होत आहे. याच वाड्यामधून संभाजी राजांना कैद केल्याचे सांगितले जाते. मात्र इतिहासकारांच्या माहितीनुसार हा वाडा नंतरच्या काळात बांधला गेला. याच परिसरातून संभाजी राजांना अटक झाली, खरीपण यावाड्याऐवजी इथे संभाजीराजांचा मोठा महाल होता. मोघलांच्या कैदेत सापडण्याआधी संभाजी महाराज 400 ते 500 मावळ्यासोबत इथल्या वाड्यात आले होते. औरंगजेबाच्या बंदोबस्तासाठी वाड्यात खलबतही झाली. मात्र स्वराज्यातल्याच काहींनी फितुरी करून संभाजी राजांच्या ठिकाणाची माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवली. आणि जवळपास तीन ते चार हजार मुघल घेऊन औरंगजेबच्या मुबारक खान ने संगमेश्वर वाड्याला वेढा दिला. एकीकडे संभाजी राजे सोबत चारशे ते पाचशे मावळे होते आणि दुसरीकडे तीन ते चार हजार जणांचं मोगली सैन्य. तरीही बरेच तास मावळ्यांनी झुंज दिली. संभाजी महाराजांच्या हातापायात साखळदंड घालून कैद करण्यात आलं. औरंगजेब महाराष्ट्रात येताना साडेचार लाख सैन्य घेऊन आला होता. मात्र तीन लाख सैन्य प्रत्यक्ष लढाया करणार होत. आणि दुसरीकडे स्वराज्यातल्या मावळ्यांची संख्या लाख सव्वा लाखापर्यंत होती. पण तरीही संभाजीराजांनी एक-दोन नाही तर तब्बल नऊ वर्षे औरंगजेबाला झुंजवत ठेवलं. हा लढा साधा नव्हता. एका बाजूला औरंगजेबाकडे सर्वोत्तम तोफखाना होत्याजी घोडदळ होते, प्रचंड खजिना होता. तरीसुद्धा संभाजी राजांच्या प्रेमासाठी इथली रयत लढली. आणि या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीतच गाडल.
संभाजी राजांना कधी पकडण्यात आला व त्यांच्यासोबत काय केले?
संभाजी राजांना संगमेश्वरला1 फेब्रुवारी 1689 रोजी पकडण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाची अकलूजला छावणी होती. संभाजी महाराजांना संगमेश्वर वरून बहादूर गडावर आणलं जात होतं त्यावेळी औरंगजेबही अकलूज वरून बहादुरगडाकडे येत होता एवढी मोठी प्राण्यांची संख्या हत्ती, घोडे, ऊंट सैनिक यांची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी गडावरती होणे शक्य नव्हतं म्हणून, हे खंडोबाचे माळ म्हणून परिचित असलेल्या ठिकाणावर औरंगजेबाच्या व्यवस्थेने या ठिकाणी व्यवस्था केली होती. की जो सर्व प्राण्यांना पाणी मिळेल सैन्यांना पाणीपुरवठा केला जाईल. यासाठी सरस्वती नदीच्या वरती मोट बसवलेली आहे. यामध्ये या मोटेला हत्ती मोठा असे म्हणतात. श्रीगोंदा शहरांमध्ये ही सरस्वती नदी आहे. पंधरा दिवस संभाजी महाराज संगमेश्वरला होते. व त्यानंतर त्यांना तुळापूरला नेण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर खूप अन्याय केला. त्यांचे डोळे काढले त्यांनी संपूर्ण अंगावरचे त्वचा काढली. आणि त्यांची दिंड काढली.औरंगजेबाने संभाजी राजांना हालहाल करून मारलं. पण तो स्वराज्य संपवू शकला नाही.
संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्के यांचं काय झालं?
गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना वतनदारी न मिळाल्यामुळे गद्दारी केली. मराठ्यांची फितुरी करत स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराजांचा पत्ता दिला यामुळे संभाजी महाराजांना अटक झाली. वतनदारीसाठी आपल्या सख्ख्या बहिणीचं कपाळ पुसल.त्यांनी अख्ख्या स्वराज्याशी गद्दारी केली.
त्याच शिर्केच पुढे काय झालं? त्याला औरंगजेबाने इनाम दिला का? शिर्के बंधूंचा अंत झाला तरी कसा? याची सविस्तर माहिती आपण पाहू.
कोल्हापूर वरून संगमेश्वर ला जायला आंबा घाट हा सर्वात नजीकचा मार्ग आहे .सह्याद्रीतल्या आडवाटेवरचा हाच मार्ग केवळ वाघ, वारा, आणि मराठ्यांनाच तोंडपाठ आहे. पण याच मार्गावरून 31 जानेवारीच्या रात्री मशालीची भली मोठी रांग संगमेश्वराच्या दिशेने जात होती. हीच बाब पन्हाळगडावरच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याला दिसली. त्याने धावत पळत सरनोबत मालोजी घोरपडेंना दृश्य दाखवल. शिवाजी सावंतच्या कादंबरीच्या आधारे हीच दृश्य छावा चित्रपटात दाखवली गेलीत. नेमकं इथूनच आपला घात झालाय, हे मराठ्यांना कळून चुकलं होतं, कारण कोल्हापुरातील शत्रू आडवाटेने रात्रीच्या अंधारात संगमेश्वरात थांबलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून जात होता. पण संगमेश्वरला जाणारा नजीकचा रस्ता शत्रूला कोणी दाखवला? छावा चित्रपटांत मावळ्याना पडलेल्या याच प्रश्नावर मशालीच्या उजेडात दोन चेहरे हायलाईट होतात. ते चेहरे असतात गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के याच शिर्केंनी वतनदारीसाठी गद्दारी केली. हे तर चित्रपटातून कळलच पण गद्दारी करणाऱ्या या शिर्केचा इतिहास काय ते पाहू.छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या. त्यापैकी शिवरायांची राजकुवर नावाची लेक दाभोळच्या पिलाजीराव यांच्या मुलाला म्हणजे गणोजी शिर्केची बहीण म्हणजेच महाराणी येसूबाई यांचा छत्रपती संभाजी महाराजांची विवाह झाला होता. याच गुणोजी आणि कान्होजी च्या वडिलांना म्हणजेच पिलाजीरावांना दाभोळच वतन पाहिजे होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारी पद्धतीला तीव्र विरोध होता. कारण या पद्धतीत राजा आणि प्रजा यांच्यातला संबंध तुटतो. आणि वतनदाराचा जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता असते. शिवाजी महाराज हायात असताना शिर्केना कधीच वतनदारी मिळाली नाही. पण पुढे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले. संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात शिर्केंनीही मदत केल्याचे सांगण्यात येतं. नंतर 1682साली गणोजी आणि कान्होजी यांनी पुन्हा संभाजी महाराजांकडून दाभोळच वतन मागितल पण शंभूराजांनीही ते नाकारलं. बस याचाच राग मनात ठेवून शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी केली स्वार्थासाठी शिर्केंनी मुकरब खानला आंबा घाटची वाट दाखवली. मोगलांना संभाजी महाराजांचा पत्ता कळवला. संभाजी महाराजांना कैद केल. त्यानंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच पाच हजारांची मनसबदारी बहाल केली. शिर्के कुटुंबाच्या महत्त्वकांक्षेला मुगल साम्राज्यात जागा मिळाली होती. पण त्यांच्या कपाळावर लागलेला गद्दारीचा शिक्का मात्र कधीच पुसता आला नाही. 1697साली राजाराम महाराजांची जिंजींच्या किल्ल्यावर कोंडी केली होती. त्याही वेळी गणोजी शिर्के मोघलांच्या बाजूने लढले होते. तेव्हा शिर्के यांनी आपल्या मराठ्यांना मदत करावी असा प्रस्ताव खंडोबल्लाळ यांनी शिर्केसमोर ठेवला होता. पण त्याही वेळी शिर्केंनी खंडोभ लाळ यांच्याकडे दाभोळच्या वतनाची मागणी केली होती. शेवटी खंडोभ लाळ त्यांनी वतन देण्याचा शब्द दिला.तेव्हा कुठे शिर्केंनी राजाराम महाराजांची सुटका करण्यात मदत केली. व त्यांना साठी गद्दारी करणाऱ्या शिर्के यांचा शेवट कसा झाला याचा इतिहासात काहीच पुरावा उपलब्ध नाही. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अनेकांचा अंदाज आहे.